About

Karhade Channel - a channel with a cause 

या चॅनल वर संस्कृत आणि मराठी श्लोक आणि इतर साहित्याचे अर्थ आणि निरूपण सांगितले आहे. SSC 10th संस्कृत चा पूर्ण अभ्यासक्रम शिकवला आहे. तसेच धमाल कॉमेडी मराठी नाटके आणि लहान मुलांचे कार्यक्रम आहेत. आपल्याला हे चॅनल आवडेल आणि त्यातून ज्ञान, आनंद आणि स्फूर्ती मिळेल ही आशा. 

संस्कृत आणि मराठी श्लोक हे नेहमी म्हटले जातात पण त्यांचा अर्थ समजून घेतला जात नाही. ते जेवढे अर्थपूर्ण आहेत तेवढेच तो अर्थ जाणून न घेता म्हणणे निरर्थक. या चॅनेल वर जवळपास सगळ्या श्लोकांचा आरत्यांचा शब्दश: अर्थ जाणून घ्या. एकदा अर्थ कळला की या पद्यसाहित्याचा योग्य उपयोग कसा करायचा ते तुमचे तुम्हाला ठरवता येईल. 

या चॅनलवर लहान मुलांची आणि मोठ्यांची अनेक नाटके आणि इतर कलाकृती आहेत. निखळ मनोरंजन आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी मुलांना मराठीची गोडी लागावी म्हणून प्रयत्न हे यामागचे प्रयोजन. 

ही सर्व नाटके अभिनव (original ) असून त्यांचे मालकीहक्क Karhade Channel कडे आहेत. नाटकांची स्क्रिप्ट हवी असल्यास कृपया इमेल वर संपर्क करावा. 

जाहिरातींमधून मिळालेला निधी हा कऱ्हाडे चॅनेल सुयोग्य कामांसाठी दान करेल.

कऱ्हाडे चॅनलमध्ये योगदान करणाऱ्या कऱ्हाडे चॅनल कुटुंबातल्या फीनिक्स मंडळींचे आणि जगभरच्या कऱ्हाडे कुटुंबियांचे चॅनल ऋणी आहे.